जिरेभुषण - समाजाचे मुखपृष्ठ


जिरेमाळी समाज सेवा सघांच्या उद्दिष्ठानुसार समाजाचे एक मुखपत्र असावे असा निर्णय घेण्यात आला. या मुखपत्राद्वारे राज्यातील ठिक-ठिकाणच्या समाजबांधवांपर्यंत संस्थेच्या उपक्रमांची तसेच समाजातील दैनंदिन घडामोडी, घटना पोहचविण्याचा हेतु डोळ्यासमोर ठेवण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने जिरेमाळी समाज सेवा संघाचा एक उपक्रम म्हणून प्रथम १ जुन २००८ रोजी सगरवैभव व त्यानंतर संस्थेच्या संपुर्ण अधिपत्याखाली जिरेभुषणची नोव्हेंबर २००८ पासुन सुरुवात करण्यात आली. जिरेभुषणद्वारे आपणा सर्वांच्या सहकार्याने राज्यातील सर्व ठिकाणच्या प्रत्येक गावातील समाज बांधवांपर्यंत पोहचण्याचा संस्थेचा मानस आहे.

मुखपत्र सुरु रहावे त्यासाठी -

राज्यस्तरीय स्तरावर सुरु करण्यांत आलेले जिरेभुषण हे समाजाचे मुखपत्र कायमस्वरुपी सुरु रहावे ही आपणा सर्वांची आंतरिक इच्छा व काळाची गरज आहे. कुठलेही मुखपत्र सुरु ठेवण्यासाठी त्यासाठी येणारा खर्च नियमित भागविणे आवश्यक आहे. मुखपत्र सुरु करतांना या बाबींचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार हा खर्च जिरेभुषणच्या आजिव सदस्य वर्गणीतून मिळणाऱ्या व्याजातून व जाहिरातीमधून भागविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जिरेभुषण अंक नोव्हेंबर २००८ पासुन सुरु आत्तापर्यंत ६ अंक प्रकाशीत.

आत्तापर्यंत एकुण ३२५ आजिव सदस्य झालेले आहेत. जिरेभुषण कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी किमान १००० सदस्यांची आवश्यकता.

निर्धारित आजीव सभासद संख्या न झाल्यामुळे अंक कायमस्वरुपी चालविण्यात अडचणी येऊ शकतात.

सध्या जिरेभुषण त्रैमासिक आहे. त्याचा वितरणाचा खर्च जास्त आहे. पोस्टल रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी मासिकाच्या स्वरुपात प्रकाशन आवश्यक.

त्यासाठी नियमितपणे लेख, आर्थिक भार पेलण्यासाठी समाजबांधवांकडून जाहिराती व सदस्य संख्या वाढविणे गरजेचे आहे.

जिरेभुषणमध्ये राज्यातील सर्व भागांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी सर्व भागातून नियमितपणे प्रसिध्दी योग्य लेख, प्रबोधनात्मक लेख, दैनंदिन ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या इ. प्रकाशनासाठी अपेक्षीत आहे.

जिरेभुषणच्या संपादक मंडळावर काम करण्यासाठी समाजातील प्रतिभाशाली समाजबांधवांनी समाजहिताच्या दृष्टीकोनातून जिरेभुषणसाठी लेख, जाहिराती व आजीव सभासद मिळविण्याचे उद्यिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढे यावे.