स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे -


प्रवेश अर्ज - प्रवेश अर्ज www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in या वेबसाइटवरुन ऑनलाइन भरायचे आहेत. प्रवेश अर्ज फी उमेदवार ऑफलाइन पध्दतीने बँक चलनाद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग द्वारे भरू शकतात. प्रवेश अर्ज ७ एप्रिल ते २५ एप्रिल २०१४ पर्यत भरता येतील. लेखी परीक्षा जून महिन्यामध्ये घेण्यात येईल. परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाइट पहावी. महाराष्ट्रात लेखी परीक्षेचे केंद्र १७ जिल्ह्यामध्ये आहे.


महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालयात 166 जागा -


महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातील आयुक्तालयात उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (4 जागा), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (5 जागा), गृहपाल/अधीक्षक-महिला व पुरुष (77 जागा), समाज कल्याण निरीक्षक (59 जागा), वरिष्ठ लिपिक (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 6 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dsw2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात 47 जागा –


पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात सहायक व्यवस्थापक (11 जागा), हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर (14 जागा), विकास अधिकारी (7 जागा), कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (3 जागा), कनिष्ठ अभियंता-इलेक्ट्रिकल (2 जागा) वरिष्ठ सहाय्यक- (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकतमध्ये दि. 28 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायकाच्या 1957 जागा -


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायक (1957 जागा) हे पद तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in/advt-001-03-03-14-002.shtm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहायकाच्या 1098 जागा –


केंद्र शासनाच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहायक (790 जागा), सॉर्टिंग असिस्टंट (170 जागा), पोस्टल सहायक-सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन (70 जागा), पोस्टल असिस्टंट इन सर्कल/विभागीय कार्यालये (38 जागा), पोस्टल असिस्टंट इन रिटर्नड लेटर ऑफिस (2 जागा), पोस्टल असिस्टंट इन मेल मोटार सर्व्हिस (16 जागा), पोस्टल असिस्टंट इन विदेशी टपाल संस्था (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनाच्या दि. 25 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.pasadrexam2014.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सिडकोमध्ये 51 जागा –


महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), मुख्य अभियंता (1 जागा), अति. मुख्य नियोजनकार (1 जागा), अधिक्षक अभियंता –स्थापत्य (1 जागा), वरिष्ठ नियोजनकार (2 जागा), वरिष्ठ विकास अधिकारी –सामान्य (1 जागा), सहयोगी नियोजनकार (4 जागा), परिवहन अभियंता (2 जागा), विधी अधिकारी (2 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), उपनियोजनकार (24 जागा), सहायक परिवहन अभियंता (10 जागा), सहायक जनसंपर्क अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 74 जागा –


औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कनिष्ठ सहायक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (24 जागा), कनिष्ठ ग्रंथालय सहायक (3 जागा), उद्यान विद्यावेत्ता (1 जागा), संशोधन सहायक (1 जागा), काच फुगारी (1 जागा), संग्रहालय सहायक (2 जागा), पुरातत्वशास्त्र आरेखक (१ जागा), उत्खनन कलाकार (1 जागा), तारतंत्री (१ जागा), सहायक दुरध्वनी चालक (1 जागा), मिश्रक नि व्रणोपचारक (2 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), यांत्रिक (१ जागा), क्षेत्रिक (1 जागा), वाहन चालक (१ जागा), गॅस अँड आर्च वेल्डर (१ जागा), सुतार (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा), विद्युत आवेक्षक (1 जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (1 जागा), सहायक लेखा परीक्षक (1 जागा), यांत्रिक (1 जागा), लघुटंकलेखक-मराठी व इंग्रजी (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (18 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.bamu.net/advt/nonteaching.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


संगणकसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर आपले परिचय पत्र पाठवावे.


prashant@jiremalisamaj.com


नोकरी विषयी काही संकेतस्थळ -

Naukri

monsterindia

timesjobs